लोकचिंतन
ताज्या घडामोडी

नॅचरल शुगर युनिट २ च्या ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उत्साहात

यावर्षी ७.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

बायो सीएनजी प्रकल्पाचाही झाला शुभारंभ

साप्ताहिक लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. युनिट नं. २ (गुंज सवना, ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सोमवारी (दि. २१ सप्टेंबर २०२६) सकाळी ११.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. मागील गळीत हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार सुदर्शन धोंडबाराव शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रूपाली शिंदे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कृषीरत्न’ श्री. बी. बी. ठोंबरे उपस्थित होते. याप्रसंगी संचालक पांडुरंगजी आवाड, प्रवर्तक श्रीपाद ठोंबरे आणि एनसाई मल्टी स्टेटचे संचालक बाळासाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

विदर्भात ५ लाख ५५ हजार मे.टन गाळपाचा उच्चांक

अध्यक्षीय भाषणात बोलताना बी. बी. ठोंबरे म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षी नॅचरल शुगरने विदर्भात उच्चांकी ५ लाख ५५ हजार मे.टन उसाचे गाळप केले. तसेच मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाला एफआरपी (FRP) नुसार पूर्ण ऊस दर शेतकऱ्यांना अदा करण्यात आला आहे.

यंदा ७.५० लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट

यावर्षी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्याकडे एकूण ९ हजार ९९४ हेक्टर उसाची नोंद केली असून या हंगामात साडेसात लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कारखान्याने सक्षम तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारली असून दररोज किमान ५ हजार ५०० मे.टन उसाचे गाळप केले जाणार आहे. या ११ व्या गळीत हंगामाचा प्रत्यक्ष शुभारंभ ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात बियाणे व खते

कारखान्याची गाळप क्षमता वाढल्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांना सुधारित ऊस जातीची प्रमाणित ऊस रोपे आणि ‘नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर’ (सेंद्रिय खत) सवलतीच्या दरात शेती गटकार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बायो सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ

बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यानंतर युनिट २ मध्ये नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘बायो सीएनजी प्रकल्पाचा’ शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यास सीताराम ठाकरे, माजी संचालक गोविंदराव शिंदे (वेणी), टिकाराम कदम (कलगाव), देविदास पाटील (सारकिन्ही), तानाजी जाधव, नानाराव पुंडे, सुनिल भवानकर यांसह कारखाना परिसरातील शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Chief Editor Gajanan waghmare

गुप्तधन काढणाऱ्या टोळीला शेतकऱ्यांनी बदडले दहिसावळी येथे मध्यरात्री थरार

Chief Editor Gajanan waghmare

महागाव पोलिसांचा विद्यार्थी सुरक्षा व पोलीस भरती मार्गदर्शनाचा दुहेरी उपक्रम

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

हल्लेखोरांची ‘सेवा’ अन् महागावकरांना ‘आनंद’!

लोकचिंतन न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ ठरेल – गणेश भोयर

Leave a Comment