लोकचिंतन
ताज्या घडामोडी

पथदिवे सुरू करण्यासाठी नगरपंचायतीसमोर ‘भीक मांगो’ आंदोलन!

नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर

 

बसस्थानक चौकात काळोखाचे साम्राज्य

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

महागाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) बंद असल्याने संपूर्ण शहरात रात्रीच्या वेळी काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, व्यापारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवदेन देऊन ७ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. मागणी पूर्ण न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर ‘भीक मांगो आंदोलन’ छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव नरवाडे यांनी दिला आहे.

बसस्थानक चौक काळोखात!

 

महागाव बसस्थानक चौकातील पथदिवे बंद असल्याने या परिसरात नेहमी वावरणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठी भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी रस्ते अंधारात असल्याने अपघात घडण्याची तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

 

शहरातील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने तपासून दुरुस्त करण्यात यावेत. जुने पथदिवे दुरुस्त होण्यासारखे नसल्यास किंवा जिथे नवी प्रकाश व्यवस्था हवी आहे, तिथे नवीन LED पथदिवे बसवण्यात यावेत. बसस्थानक चौकात प्राधान्याने नवीन पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था सुरळीत करावी. केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रशासनाने लेखी स्वरूपात द्यावी. अशा जनहिताच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम!

 

येत्या ७ दिवसांच्या आत सर्व बंद पथदिवे सुरू न झाल्यास नगरपंचायत प्रशासनाविरोधात ‘भीक मांगो आंदोलन’ करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय नरवाडे यांनी दिला आहे. आता नगरपंचायत प्रशासन ७ दिवसांत खडबडून जागे होऊन पथदिवे दुरुस्त करते की नागरिकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते, याकडे संपूर्ण महागाव शहराचे लक्ष लागले आहे.

Related posts

महागाव येथे राष्ट्रीय लोकअदालतीत १२९ प्रकरणे निकाली

Chief Editor Gajanan waghmare

गुंज सबस्टेशनवरील एजी पंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित  

Chief Editor Gajanan waghmare

गावठी पिस्टल बाळगणारा पुसदचा आरोपी महागावात सापडला

फुलसावंगीतील ४४ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Chief Editor Gajanan waghmare

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन  

Leave a Comment