लोकचिंतन

LCB ने आवळल्या मुसक्या

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयीतांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला गावठी बनावटीच्या देशी पिस्टलसह अटक केली. आरोपीकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके विविध भागांत गस्त व शोधमोहीम राबवत आहेत. आज मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. अंबोडा गावाजवळील तुळजापूर-नागपूर महामार्गावरील अतिथी हॉटेल परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्टल बाळगून उभा असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रवि संतोष शिंगारे (२९, रा. धम्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे देशी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या पिस्टलची किंमत सुमारे ३० हजार रुपये, तर काडतुसाची किंमत एक हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार मुन्ना आडे, संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Related posts

१२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

Chief Editor Gajanan waghmare

टोल नाक्यावर सहायक पोलीस निरीक्षकाची संपादकासोबत दादागिरी

महिलांच्या हाराकिरीमुळे आडवी बाटली माघारली

Chief Editor Gajanan waghmare

१६ एप्रिलला होणार दारू दुकानाचा फैसला

Chief Editor Gajanan waghmare

मतदार यादीतील त्रुटींचा आडव्या बाटलीला फटका

आमणी (खुर्द) येथे आंबेडकर जयंतीच्या बॅनरची विटंबना

Leave a Comment