लोकचिंतन

 

ड्रग फ्री तालुक्यासाठी पुढाकार

महागाव शहर व ग्रामीण भागात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला व वापरला आळा घालण्यासाठी महागाव पोलीस ठाण्याकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. परिसरातील गांजा, एमडी (मेफेड्रोन) यांसारख्या घातक अंमली पदार्थांची विक्री, खरेदी, वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून, याबाबत नागरिकांनी पोलीसांना निर्भीडपणे माहिती द्यावी, असे जाहीर आवाहन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी केले आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे युवा पिढी भरकटत असून, याचे गंभीर दुष्परिणाम सामाजिक आरोग्यावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर होत आहेत. नशेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि परिसर संपूर्णपणे ‘ड्रग-फ्री’ (अमली पदार्थमुक्त) करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे

माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय राहणार

अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारांची माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव, पत्ता आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. तसेच, माहितीदात्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भीतीला वा दबावाला बळी न पडता ८७६६०६५३३५ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

“अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी ही केवळ गुन्हेगारी नसून तो आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे. युवा पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे,” असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी केले.

Related posts

नगर पंचायत मध्ये काँग्रेसचे ‘वाजले की बारा’

Chief Editor Gajanan waghmare

टोल नाक्यावर सहायक पोलीस निरीक्षकाची संपादकासोबत दादागिरी

आमणीतील अवैध दारूचा कहर: २० हातभट्ट्या पेटल्या

Chief Editor Gajanan waghmare

हायकोर्टात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द, मात्र दारू दुकान राहणार बंदच!

Chief Editor Gajanan waghmare

महागाव येथे राष्ट्रीय लोकअदालतीत १२९ प्रकरणे निकाली

Chief Editor Gajanan waghmare

गोवंश तस्करांचा रक्तरंजीत धुमाकूळ

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment