लोकचिंतन
ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीशी कथित गैरवर्तनाच्या आरोपावरून गुंजमध्ये तणाव

४२ वर्षीय इसमाला संतप्त जमावाची मारहाण

पोलीस वाहनाला घेराव

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

अल्पवयीन विद्यार्थीनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याच्या आरोपावरून गुंज येथे गुरुवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शाळेच्या मागील शेतात संबंधित इसम आणि अल्पवयीन मुलगी आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याची माहिती गावात पसरताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. अकबर आझाद पठाण (वय ४२, रा. गुंज) याला जमावाने पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर संतापाचा उद्रेक बसस्थानक परिसरापर्यंत पोहोचला. शेकडो संतप्त लोक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सेवानंद वानखेडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जमावाने पोलिसांच्या वाहनाला घेराव घातल्याने परिस्थिती आणखी चिघळली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध करत काही जणांनी वाहन उलटविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

 

शेतातील घटनेची वार्ता अन् गावात संताप

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुंज येथील विद्यालयात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेच्या परिसरात होती. आरोपी अकबर पठाण याने तिला फुस लाऊन शाळेबाहेर नेले. त्यानंतर शाळेच्या मागील शेतात दोघे आक्षेपार्ह स्थितीत काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येते. ही माहिती काही वेळातच गावभर पसरली. संतप्त नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि संबंधित इसमाला पकडण्यात आले. जमावाकडून त्याला चांगला चोप देण्यात आला. 

बसस्थानक परिसरात अघोषित रास्ता रोको

घटनेचा निषेध करण्यासाठी संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. बसस्थानक परिसरात गर्दी वाढल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ रस्तारोकोसदृश परिस्थिती निर्माण झाली. वाहनांच्या रांगा लागल्या आणि परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करीत जमाव अधिकच संताप झाला.

पोलिसांच्या वाहनाला घेराव

 

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन वाहनात बसविले. मात्र, संतप्त जमावाने पोलीस वाहनाला चारही बाजूंनी घेराव घातला. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत जमावाने वाहनाभोवती गर्दी केली. काही तरुणांनी वाहन उलटविण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलीस वाहनात बसविले.

परिस्थिती संवेदनशील

जमावाचा वाढता रोष, रस्त्यावरची गर्दी आणि पोलिसांच्या वाहनाला घेराव या पार्श्वभूमीवर गुंज येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी संयम राखत जमावाशी संवाद साधला. कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ताब्यात घेतले तरीही तणाव कायम होता.

आयपीएस गौरव कायंदे पाटील, अशोक थोरात घटनास्थळी

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील (आयपीएस) आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हेही घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनेनंतर गुंजमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. परिस्थितीवर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने तिची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपासात आणखी कोणते तथ्य समोर येतात आणि पोलिस काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Related posts

गोवंश तस्करांचा रक्तरंजीत धुमाकूळ

Chief Editor Gajanan waghmare

आमणी (खुर्द) येथे आंबेडकर जयंतीच्या बॅनरची विटंबना

गुप्तधन काढणाऱ्या टोळीला शेतकऱ्यांनी बदडले दहिसावळी येथे मध्यरात्री थरार

Chief Editor Gajanan waghmare

थार वाहनाच्या मालकीवरून महागावात धुमश्चक्री

Chief Editor Gajanan waghmare

दलित शेतकरी कुटुंबाला भूमिहीन करून फसवणूक

उपद्रवी लोकांना कारवाईचे “टेरामायसीन” देणार !

Leave a Comment