लोकचिंतन

कला वाणिज्य महाविद्यालयातील चोरीचा पर्दाफाश

 

चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त

 

सुरजचे ३ साथीदार पोलीसांच्या रडारवर

महागाव येथील आठवडी बाजारालगत असलेल्या कला व वाणिज्य महाविद्यालयात चोरी करून संगणक व अन्य साहित्य लंपास करणाऱ्या चौघांच्या टोळीचा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महागाव पोलिस दफ्तरी असलेल्या या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.

महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे कुलूप व कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्याची चोरी केली होती. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५,३३१ (३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान महागाव शहरातील स्मशानभुमी परिसरातील फुकट नगरात राहणाऱ्या सुरज प्रकाश पवार (वय २४) व त्याच्या तीन साथीदारांनी हा गुन्हा केल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार महागाव बाजारपेठ परिसरात सापळा रचून सुरज पवार याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सुरुवातीला चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीला बाजीराव दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून चोरीस गेलेले दोन सीपीयू, एक संगणक मॉनिटर, एक प्रिंटर तसेच की-बोर्ड आणि माऊस असा सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून मुख्य आरोपी सुरज प्रकाश पवार याला पुढील तपासासाठी महागाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार मुन्ना आडे, संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Related posts

महिलांच्या हाराकिरीमुळे आडवी बाटली माघारली

Chief Editor Gajanan waghmare

आमणीतील अवैध दारूचा कहर: २० हातभट्ट्या पेटल्या

Chief Editor Gajanan waghmare

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त आज राज्यस्तरीय आदर्श उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा

aadvaith46@gmail.com

महागाव शहरात स्वच्छता अभियानाची धडाक्यात सुरुवात

Chief Editor Gajanan waghmare

४८ तासानंतरही पोलीसांना आरोपी सापडेना 

बँकेच्या अडेलतट्टू कारभारामुळे विधवा शेतकरी महिलेची फरफट

Leave a Comment