लोकचिंतन

शेतकरी प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

 

लोकनचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे आज गुरुवार दि. १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात शेतकरी प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सहवेदना व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन दरवर्षी आयोजित केले जाते. चिलगव्हाण येथील वैफल्यग्रस्त शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी वर्धा येथील पवनार आश्रमात पत्नी व चार अपत्यांसह सामूहिक आत्महत्या केली होती. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेची आठवण म्हणून तसेच शेतकरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते अमर हबीब यांच्या संकल्पनेतून मागील दशकभरापासून १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन राबविण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील या आंदोलनात शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार संजयभाऊ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शेतकरी नेते मनीष जाधव, लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनायकराव देशमुख, मराठा सेवा संघाचे डॉ. संदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. यावेळी महागाव न.प. चे उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाका भरवाडे, शिवसेना नेते भीमराव भालेराव, नायब तहसीलदार गजानन पराते, सरपंच प्रभावती प्रमोद काळे, पोलीस पाटील डॉ. लक्ष्मण बोरकुट, उपसभापती बाळू करपे, मारोतराव करपे, पांडुरंग बोरकुट, पंजाबराव पारध, माजी सरपंच सुनील मंदाडे, विनायक बोरकुट, मंडळ अधिकारी मानकर साहेब, तलाठी रायपुरकर, शिवसेना नेते शामराव काळे, अशोक काळे, बीट जमादार बाबर साहेब, ग्रामपंचायत अधिकारी कुरवाडे मॅडम, संतोष आसोले, संगणक परिचारक सुधाकर काळे, शिपाई रमेश करपे, राहुल भामकर, आतिश डोंगरे, कोतवाल योगेश हातमोडे, ज्ञानेश्वर खंदारे, दिलीप रावते, प्रकाश खंदारे, दिनेश काळे आदी उपस्थित होते. अन्नत्याग आंदोलनाद्वारे शेतकरी प्रश्न, आर्थिक अडचणी व स्थानिक समस्या यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.

Related posts

मतदार यादीतील त्रुटींचा आडव्या बाटलीला फटका

नव्या देशी दारू दुकानाचा राजकीय खलनायक कोण ?

Chief Editor Gajanan waghmare

धर्मरक्षणासाठी दिव्य विशाल हिंदू संमेलन

Chief Editor Gajanan waghmare

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना उन्हाच्या झळा

Chief Editor Gajanan waghmare

भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

दिग्रस येथे रविवारी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment