लोकचिंतन

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

 

तीन धडक कारवायांमध्ये ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

११ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

महागाव पोलीस ठाण्याच्या पथकाने तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबवत दोन ठिकाणी सुरू असलेले ५२ ताश पत्त्यांचे जुगार अड्डे उद्ध्वस्त केले, तर धनोडा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली. या तीन स्वतंत्र कारवायांत एकूण ६ लाख ७१ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खडका फाटा येथील जंगल परिसरात छापा टाकला. तेथे सुरू असलेल्या ५२ ताश पत्त्यांच्या जुगारावर कारवाई करत पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत डावावरील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमालासह १ लाख ३६ हजार ७८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी मुडाणा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ लगत असलेल्या शिवतेज हॉटेलच्या मागील नाल्यात सुरू असलेल्या दुसऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा २८ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, धनोडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील पुलावरून एक ट्रॅक्टर-ट्रॉली विनापरवाना अवैध रेतीची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत एक ब्रास रेती व ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये नोंदविण्यात आला आहे. या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. प्रसेनजीत जाधव, पोहेकॉ. कैलास नेवकर, पोहेकॉ. केशव चव्हाण, पोहेकॉ. वसीम शेख, नापोकॉ. सुनील माथने, पोशि. सुनील जाधव व पोशि. संदीप तलांडे यांनी या कारवायांमध्ये सहभाग घेतला.

Related posts

भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

शासनाच्या आरक्षण वर्गीकरणाचा डाव हाणून पाडू !

अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

४८ तासानंतरही पोलीसांना आरोपी सापडेना 

शेणंद गावात ७० टक्के नागरिकांना अज्ञात तापा चा विळखा

Chief Editor Gajanan waghmare

१६ एप्रिलला होणार दारू दुकानाचा फैसला

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment