लोकचिंतन

महागाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथील रहिवासी राजू गुणाजी भिसे (वय २५) या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी सकाळी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील निंबाच्या झाडाला लटकलेला आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्येची घटना असून, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२८ जून) रात्री ही घटना घडली असावी. रविवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास मृतदेह आल्यानंतर मोक्षधाम समितीचे अध्यक्ष उदय नरवाडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.राजू भिसे हा बेरोजगार असून छोटी-मोठी कामे करून कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे.

Related posts

पाचशे वर्षांची परंपरा जपणारे गौळ राऊतवाडीचे श्री हनुमान मंदिर

Chief Editor Gajanan waghmare

महागाव शहरात स्वच्छता अभियानाची धडाक्यात सुरुवात

Chief Editor Gajanan waghmare

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

१२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

Chief Editor Gajanan waghmare

प्रभाग १ मधील देशी दारू दुकान आणि वाईन बारला शेवटचे कुलुप

Chief Editor Gajanan waghmare

चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन  

Leave a Comment