लोकचिंतन
ताज्या घडामोडी

प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

 

 

अंगणवाडी मदतनीस पदासाठी ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

 अंगणवाडी मदतनीस पदावर निवड करून देण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी महागाव येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अतिरिक्त कार्यभारावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-३) शंकुतला जयवंत इंगोले (वय ५७) यांना ५ हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), यवतमाळच्या पथकाने आज बुधवार दि. २२ जुलै रोजी रंगेहात ताब्यात घेतले. एसीबीने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार, २१ वर्षीय महिला तक्रारदाराने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला होता. संबंधित पदावर निवड करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी १० हजारांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान आरोपीने १० हजारांच्या लाचेपैकी प्रथम हप्ता म्हणून ५ हजार स्वीकारण्यास व उर्वरित ५ हजार नंतर स्वीकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार एसीबीने त्याच दिवशी सापळा रचला. तक्रारदारास पंचांसमक्ष आरोपीच्या महागाव येथील राहत्या घरी पाठविण्यात आले. तेथे आरोपीने स्वयंपाकघरात तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिला रंगेहात ताब्यात घेतले.

या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके तसेच एसीबीच्या पथकाने केली. एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवून तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Related posts

गोवंश तस्करांचा रक्तरंजीत धुमाकूळ

Chief Editor Gajanan waghmare

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

महागाव येथे राष्ट्रीय लोकअदालतीत १२९ प्रकरणे निकाली

Chief Editor Gajanan waghmare

गुंज सबस्टेशनवरील एजी पंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित  

Chief Editor Gajanan waghmare

१६ एप्रिलला होणार दारू दुकानाचा फैसला

Chief Editor Gajanan waghmare

१२ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment