लोकचिंतन
ताज्या घडामोडी

दिग्रस येथे रविवारी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी

उत्कृष्ट पाळीव जनावरांसाठी सव्वा दोन लाखांहून अधिक रोख बक्षिसांची संधी

 

शनिवारी होणारी पशुप्रदर्शनी काही अपरिहार्य कारणांमुळे आता एक दिवस उशीरा म्हणजे रविवार दि १ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ आणि पंचायत समिती दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी सतीश लक्ष्मणराव बनगिनवार (राज डेव्हलपर्स) यांच्या वडवाला जीनिंग प्रांगणात सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये पशुसंवर्धनाविषयी आवड, जागरूकता आणि आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाबाबत प्रेरणा निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या पशू प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट पाळीव जनावरांची तज्ज्ञ समितीमार्फत निवड करण्यात येणार असून विजेत्या पशुपालकांना तब्बल २ लाख १८ हजारांची रोख बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. संकरित वासरे (नर), संकरित वासरे (मादी), देशी/गावठी गाय, संकरित गाय, बैलजोडी, म्हैस,शेळी, कुक्कुट, या गटात बक्षिसे दिली जाणार आहेत. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. अशोक उईके राहणार आहेत. तसेच राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार भावनाताई गवळी, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, आमदार राजू तोडसाम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय दरेकर, आमदार किसनराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दुपारी २ वाजता बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अमरावती डॉ. येसुदेव वंजारी, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. मंगेश काळे, तहसीलदार मयूर राऊत यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिग्रस तालुक्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या उत्कृष्ट पाळीव जनावरांसह मोठ्या संख्येने या प्रदर्शनीत सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप नागापुरे, गटविकास अधिकारी रमेश खरोडे, सहायक गटविकास अधिकारी मधुकर मुंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण जाधव (लिंगी) व पुरुषोत्तम नरांजे (दिग्रस) यांनी केले आहे. ही पशू प्रदर्शनी केवळ स्पर्धा नसून दिग्रस तालुक्यातील पशुपालकांसाठी प्रगतीचा, सन्मानाचा आणि प्रेरणेचा एक मोठा उत्सव ठरणार आहे.

Related posts

चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन  

धर्मरक्षणासाठी दिव्य विशाल हिंदू संमेलन

Chief Editor Gajanan waghmare

महागाव नगरपंचायत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल 

Chief Editor Gajanan waghmare

बँकेच्या अडेलतट्टू कारभारामुळे विधवा शेतकरी महिलेची फरफट

दगडथर येथे अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

सायबर फसवणूक रोखण्यासाठी जागरूकतेची गरज !

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment