लोकचिंतन
ताज्या घडामोडी

दगडथर येथे अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

 

दोन्ही डोळे निकामी झाल्याची भीती

तालुक्यातील दगडथर येथे आज सकाळी अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. उत्तम मारोती खराटे (वय ५५, रा. दगडथर) हे शेताकडे जात असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास शेताकडे जात असताना झुडपात दडी मारून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली असून विशेषतः दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाल्यामुळे ते पुर्णतः निकामी झाल्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमी अवस्थेतील खराटे यांना प्रथम स्थानिक पातळीवर उपचारासाठी हलविले. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना नांदेड येथील यशोसाई रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तम खराटे यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीवर ओढवलेल्या या संकटामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व विशेष भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढविण्याची तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Related posts

हायकोर्टात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द, मात्र दारू दुकान राहणार बंदच!

Chief Editor Gajanan waghmare

पाचशे वर्षांची परंपरा जपणारे गौळ राऊतवाडीचे श्री हनुमान मंदिर

Chief Editor Gajanan waghmare

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

सायबर फसवणूक रोखण्यासाठी जागरूकतेची गरज !

Chief Editor Gajanan waghmare

प्रभाग १ मधील देशी दारू दुकान आणि वाईन बारला शेवटचे कुलुप

Chief Editor Gajanan waghmare

धर्मरक्षणासाठी दिव्य विशाल हिंदू संमेलन

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment