लोकचिंतन

हिंदू धर्म ही केवळ आस्था नसून ती जीवनपद्धती आहे. त्या चिरंतन धर्माची पताका उंचावण्यासाठी, हिंदू संस्कृतीचे तेज पुन्हा समाजमनात प्रज्वलित करण्यासाठी व वैचारिक अधःपतनातून समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पवित्र, दिव्य व प्रेरणादायी “विशाल हिंदू संमेलन” आज २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सवना, ता. महागांव, जि. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. हे धर्ममहोत्सवी संमेलन भगवानराव नहातकर यांच्या पवित्र भूमीत, पुसद रोड, सवना येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य सद्धर्म शिरोमणी गोवत्स श्री. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

(श्री शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तीर्थक्षेत्र, पिंपळगांव, ता. हदगांव, जि. नांदेड) हे आपल्या करुणामयी दृष्टीने उपस्थित भक्तगणांना धर्ममार्गाचे अमृत प्रदान करणार आहेत. या दिव्य सोहळ्यास अनेक तेजस्वी संत, महंत व धर्मगुरूंची पावन उपस्थिती लाभणार आहे. त्यामध्ये परमपूज्य योगी श्री. श्यामसुंदर भारती महाराज,

परमपूज्य धर्मगुरू महंत श्री. जितेंद्र महाराज,

परमपूज्य महंत श्री. गोपालगिरी महाराज, तपोनीधी वैराग्यमूर्ती संत श्री. गुरू भगवानगिरी महाराज, परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री. गजानंद माऊली, परमपूज्य अनंतराज अंकुळनेरकर श्री. आबासाहेब बाबासाहेब,

ह.भ.प. प.पू. श्री. नारायण महाराज शिंदे, तसेच परमपूज्य गुरुवर्य तानाजी बापू मुडाणकर

यांच्या चरणस्पर्शाने संमेलन भूमी पावन होणार आहे. या धर्मसंगमात देशाच्या विविध भागांतून आलेले संत-महंत, धर्मप्रचारक व विचारवंत सनातन संस्कृतीचे अद्वितीय महत्त्व, हिंदू समाजावर येणारी समकालीन संकटे, सामाजिक समरसता, राष्ट्रधर्म व धर्मरक्षणाची जबाबदारी या विषयांवर ओजस्वी, प्रेरणादायी व अंतःकरणाला स्पर्श करणारे मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाचे मुख्य वक्ते म्हणून धर्मनिष्ठ विचारवंत गजानन शिंदे (रा. मार्लेगाव, ता. उमरखेड) उपस्थित राहणार असून, समाजातील प्रत्येक घटकाच्या हृदयात धर्माभिमान, राष्ट्रभक्ती व हिंदू एकात्मतेचा दीप प्रज्वलित करणे हाच या संमेलनाचा संकल्प असल्याचे आयोजकांनी नमूद केले. सकल हिंदू समाज सवना व विशाल हिंदू संमेलन आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या धर्मप्रबोधन पर्वाला राज्यभरातून व परिसरातील भाविक, माताभगिनी, युवक व वृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सनातन धर्माच्या या यज्ञात आपली आहुती अर्पण करावी, असे भावनिक व भक्तीपूर्ण आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

दलित शेतकरी कुटुंबाला भूमिहीन करून फसवणूक

सायबर फसवणूक रोखण्यासाठी जागरूकतेची गरज !

Chief Editor Gajanan waghmare

दगडथर येथे अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

आमणीतील अवैध दारूचा कहर: २० हातभट्ट्या पेटल्या

Chief Editor Gajanan waghmare

सवना येथील जि. प. कन्या शाळा रामभरोसे

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment