लोकचिंतन

कलगाव फ्लायओव्हरजवळ मध्यरात्री अपघात

 

उपचारादरम्यान मंगेश कुसंगवाड यांची प्राणज्योत मालवली

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

कलगाव फ्लायओव्हरजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत महागाव येथील मंगेश लक्ष्मण कुसंगवाड (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मंगेश यांच्या अकस्मिक निधनाने कुसंगवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महागाव शहरातही हळहळ व्यक्त होत आहे. निवृत्त मंडळ अधिकारी लक्ष्मण कुसंगवाड यांचा मंगेश हा धाकटा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश हा मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण आटोपून तो मोटारसायकलने एकटाच परतत असताना कलगाव फ्लायओव्हरनजीक अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत मंगेश गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला तसेच पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. अपघातानंतर तो राज्यमार्गावर गंभीर अवस्थेत पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याचे मित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मंगेशची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. यावेळी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर यांनी स्वतःच्या वाहनातून जखमी मंगेशला पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगेशची प्राणज्योत मालवली. मंगेश हा अविवाहित होता. अवघ्या २८व्या वर्षी झालेल्या त्याच्या अकस्मिक निधनाने कुसंगवाड कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. एका होतकरू तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने महागाव परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related posts

४८ तासानंतरही पोलीसांना आरोपी सापडेना 

अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

महागाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर

नव्या देशी दारू दुकानाचा राजकीय खलनायक कोण ?

Chief Editor Gajanan waghmare

चिलगव्हाण येथे अन्नत्याग आंदोलन  

मृत खातेदार ‘जिवंत’ दाखवून बँकेतून ३२ हजराचा विड्रॉल ? 

Leave a Comment