लोकचिंतन

 

मराठा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम

महागाव तालुक्यातील युवकांनी महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस शिपाई पदावर निवड मिळवली असून, त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी मराठा सेवा संघ, महागाव तालुक्याच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत वाघनाथ येथील अभिजीत गजानन शिंदे (१३४ गुण) आणि करंजखेड येथील अविनाश देविदास भांगे (१३३ गुण) यांनी खुल्या प्रवर्गातून यश मिळवत पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड मिळवली. या दोन्ही युवकांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी जिल्हा परिषद शाळेत झाले असून, पुढील शिक्षण महागाव येथील मातोश्री विद्यालयात पूर्ण झाले. तसेच, स्थानिक ‘श्री अभ्यासिका सेंटर’मध्ये सातत्यपूर्ण अभ्यास व मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने दोन्ही युवकांचा तसेच त्यांच्या पालकांचा प्रशस्तीपत्र, ‘शिवरायांचे शिवकार्य’ हे पुस्तक, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार सोहळ्यास मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव डॉ. संदीप शिंदे, तालुका अध्यक्ष उदय नरवाडे, तालुका सचिव पंकज देशमुख, कार्याध्यक्ष सतीश ठाकरे, उपाध्यक्ष विठ्ठल वाघमारे, प्रसिद्धीप्रमुख गजानन वाघमारे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, तसेच श्री कॉम्प्युटर व श्री अभ्यासिका सेंटरचे संचालक मंगेश पाटील वानखेडे, पत्रकार राज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

प्रभाग १ मधील देशी दारू दुकान आणि वाईन बारला शेवटचे कुलुप

Chief Editor Gajanan waghmare

गोवंश तस्करांचा रक्तरंजीत धुमाकूळ

Chief Editor Gajanan waghmare

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

शेणंद गावात ७० टक्के नागरिकांना अज्ञात तापा चा विळखा

Chief Editor Gajanan waghmare

पंचायत समितीच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नगर पंचायत मध्ये काँग्रेसचे ‘वाजले की बारा’

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment