लोकचिंतन

 

 

 महागावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत आज मंगळवार दि. ७ एप्रिल रोजी महागाव येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कॅम्पला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेल्या या कॅम्पमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नावांची पडताळणी तसेच आवश्यक दुरुस्त्या करून घेतल्या. या उपक्रमांतर्गत मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावातील किंवा पत्त्यातील चुका दुरुस्त करणे, नाव वगळणे किंवा इतर बदल करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे विशेषतः युवक, नवमतदार तसेच स्थलांतरित नागरिकांनी कॅम्पचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रशासनाच्या वतीने मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. अनेकांनी मतदान ओळखपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रियेची पूर्तता केली. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने या कॅम्पचे महत्त्व अधोरेखित झाले. दरम्यान, नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. लोकशाही व्यवस्थेची भक्कम पायाभरणी अचूक मतदार यादीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने आपली नोंद तपासून आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे त्या म्हणाल्या. नागरिकांनीही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत अशा कॅम्पमुळे प्रक्रिया सुलभ होत असल्याची प्रतिक्रिया दिली. एकूणच, मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Related posts

गावठी पिस्टल बाळगणारा पुसदचा आरोपी महागावात सापडला

महागाव–गुंज रस्त्यावर पॅचवर्कचा महाघोटाळा पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस ठेकेदार–अधिकाऱ्यांची संगनमताने लूट

Chief Editor Gajanan waghmare

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त आज राज्यस्तरीय आदर्श उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा

aadvaith46@gmail.com

लोणार येथील दैत्यसुदन मंदिर- मध्ययुगीन वास्तुकलेचा अद्वितीय नमुना

पोखरी घाटात निलगायीची निर्घृण शिकार

Chief Editor Gajanan waghmare

थार वाहनाच्या मालकीवरून महागावात धुमश्चक्री

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment