लोकचिंतन

 

अटीतटीच्या लढतीत एका मताने उभ्या बाटलीचा विजय

महागाव शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये देशी दारूची बाटली कायमची आडवी करण्याची लढाई महिला मतदारांनी केलेल्या हाराकिरीमुळे अपयशी ठरली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत केवळ एका मताने महिलांचा लढा अयशस्वी झाला. प्रभागातील एकूण महिला मतदानाच्या ५० टक्के मतदानाला अवघे १ मत कमी पडल्यामुळे येथे अनपेक्षितरित्या उभी बाटली जिंकून आली.
देशी दारूची बाटली आडवी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिलांच्या मतदान प्रक्रियेत जवळपास ५० टक्के महिलांनी मतदानाला दांडी मारली. वेगवेगळ्या कारणांमुळे महिला मतदानाला १४५ पैकी केवळ ७७ महिलांनी प्रत्यक्ष मतदान केले. १४५ महिला मतदारांपैकी ५ महिला मतदार मयत असल्यामुळे महागाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी मतदान प्रक्रियेत १४० मतदार अधिकृतरित्या गृहीत धरले जातील अशी आधीच घोषणा केली होती. ५० टक्के मतदानावर बाटली आडवी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी देऊ शकतात. याचा अर्थ झालेल्या ७७ मतदानापैकी किमान ७० मते आडव्या बाटलीस होणे अनिवार्य होते. तसे झाले तरच प्रभागात आडवी बाटली होणार होती. परंतू आडव्या बाटलीच्या बाजुने ६९ मते पडली. मतदान केंद्रात उभ्या बाटलीच्या बाजूने केवळ ७ मते पडली. एका बॅलट पेपरवर फुलीच्या शिक्क्याऐवजी शाईचा अंगठा लाऊन मतदान केल्याचे आढळले.मतदान अधिकारी अजय कुरवाडे यांनी हे मतदान बाद ठरवले. मतदानासाठी गैरहजर राहिलेल्या ७० महिलांचे मतदान उभ्या बाटलीच्या बाजूने गृहीत धरल्या जाते. त्यामुळे आडव्या बाटलीला अवघे १ मत कमी पडल्यामुळे महिलांनी उभा केलेला हा दारूबंदीचा लढा अगदी काठावर अयशस्वी ठरल्याचे बोलल्या जात आहे. मतदान अधिकारी म्हणून महागाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी काम पाहिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी. एस. वाघ, उपनिरीक्षक अनिल पिकले, उपनिरीक्षक राज्य उत्पादन पुसद सुकेशनी शिंदे यांच्या सहकार्याने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

उभ्या बाटलीला भ्रष्ट नगरसेवकांचा आधार

प्रभाग १ मधील महिलांचे संघटन करून नगरसेविका जयश्री नरवाडे, नगराध्यक्ष रंजना दीपक आडे, नगरसेवक सुरेश उत्तमराव नरवाडे, अणि नगरसेवक रामराव पाटील नरवाडे यांनी छातीठोकपणे ही लढाई लढली. यात काही नगरसेवकांचे मुक समर्थन होते. मात्र काहींनी उघड उघड दारू दुकानदाराची व बारमालकाची तळी उचलली आणि महिलांचा लढा हाणून पाडला.

जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणार दाद

मतदान अधिकारी असलेले मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी केवळ मतमोजणी करून मतदानाची सरासरी स्पष्ट केली. अंतिम निर्णय मात्र जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. मतदान अधिकारी यांनी बाद ठरविलेले मत आडव्या बाटलीला झाले असल्याने ते वैध ठरवावे यासाठी दारूबंदी निर्मूलन समितीच्या महिला जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी ते मत वैध ठरवल्यास आडव्या बाटलीचा विजय जाहीर होऊ शकतो.

Related posts

दिग्रस येथे रविवारी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी

Chief Editor Gajanan waghmare

गुंज सबस्टेशनवरील एजी पंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित  

Chief Editor Gajanan waghmare

दलित शेतकरी कुटुंबाला भूमिहीन करून फसवणूक

मतदार यादीतील त्रुटींचा आडव्या बाटलीला फटका

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटमुळे आग

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment