लोकचिंतन

महागाव तालुक्यात जाणवले सौम्य धक्के

 

लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

 

हिंगोली जिल्ह्यात आज शनिवारी सकाळी ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे सौम्य धक्के यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातही जाणवले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. महागाव तालुक्यातील वाकोडी येथे सकाळी सुमारे ८.४५ वाजता पहिला सौम्य धक्का जाणवला, तर डोंगरगाव परिसरात ८.४७ वाजता कंपनाची नोंद झाली. पाच ते सहा सेकंद टिकलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मते, अचानक घरातील वस्तूंमध्ये थरथर जाणवली तसेच पत्र्यांच्या छपरांमध्ये आवाज झाला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यात असून तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे परिसरातील काही भागांमध्ये सौम्य धक्के जाणवले. प्रशासनाने नागरिकांना दिलासा देताना सांगितले की, हे धक्के सौम्य स्वरूपाचे असून घाबरण्याचे कारण नाही. महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महागाव तालुका याआधीही सूक्ष्म भूकंपीय हालचालींसाठी ओळखला जातो. ११ जुलै २०२१ रोजी यवतमाळ जिल्ह्यात ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तज्ञांच्या मते, विदर्भातील काही भागांमध्ये अधूनमधून अशा सौम्य हालचाली होत राहतात. हिंगोलीतील या भूकंपाचे परिणाम मर्यादित राहिले असले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Related posts

दिग्रस येथे रविवारी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी

Chief Editor Gajanan waghmare

मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी बीएलओ कॅम्प

दगडथर येथे अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

महागाव–गुंज रस्त्यावर पॅचवर्कचा महाघोटाळा पुसद बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा कळस ठेकेदार–अधिकाऱ्यांची संगनमताने लूट

Chief Editor Gajanan waghmare

आमणी (खुर्द) येथे आंबेडकर जयंतीच्या बॅनरची विटंबना

Leave a Comment