लोकचिंतन

 

निर्णायक मतदानाद्वारे होणार बाटली आडवी

 

प्रभाग क्रमांक १ मधील वर्दळीच्या व्यापारी परिसरात सुरू झालेले देशी दारू दुकान आणि शेजारील वाईन बारच्या विरोधात स्थानिक महिलांनी उभारलेल्या आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, बाटली आडवी करण्यासाठी १६ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. गुप्त मतदानाद्वारे दारू दुकानाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महिलांनी सादर केलेल्या निवेदनातील सह्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ७ मार्च रोजी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात पडताळणी करण्यात आली. एकूण ४२ सह्या वैध ठरल्या, त्या एकूण संख्येच्या २५ टक्क्यांहून अधिक असल्याने गुप्त मतदानाची प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले होते. दरम्यान, संबंधित आदेश नगरपंचायतीकडे वेळेवर पोहोचूनही निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आरोप नगरसेविका जयश्रीताई नरवाडे यांनी केला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवर या टाळाटाळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने अखेर हालचाल करीत मतदानाची तारीख निश्चित केली आहे. प्रभाग क्रमांक १ मधील कै. वसंतरावजी नाईक यांच्या तैलचित्राजवळ असलेले सीएल-३ क्र. ७९ परवानाधारक देशी दारू दुकान तसेच लगतचा बैठक वाईन बार बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे. मतदान प्रक्रिया १६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सावित्रीबाई फुले कन्या शाळेत पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

 

मतदानावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न

 

दरम्यान, या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न काही लालची लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याचे आरोप होत आहेत. काही लोकप्रतिनिधींकडून महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आमिषे दाखविणे, तीर्थयात्रेचे प्रलोभन देणे अशा प्रकारांनी मतदान वळविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक मतदारांमध्ये तीव्र नाराजी असून, अशा प्रकारांना पाठबळ देणाऱ्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार शहरातील जनतेने केला आहे. चौकाचौकांत या विषयावर जोरदार चर्चा रंगत असून, १६ एप्रिलचे मतदान केवळ दारू दुकानाच्या भवितव्याचा नव्हे, तर स्थानिक राजकारणाच्या दिशेचाही कौल ठरणार असल्याचे चित्र आहे.

Related posts

देशी दारू दुकानावरून स्थानिक नगरसेविकेचे मौन संशयास्पद

जंतर-मंतर येथील घटनेच्या निषेधार्थ महागावात शुक्रवारी रस्ता रोको

Chief Editor Gajanan waghmare

नगर पंचायत मध्ये काँग्रेसचे ‘वाजले की बारा’

Chief Editor Gajanan waghmare

दिग्रस येथे रविवारी भव्य तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी

Chief Editor Gajanan waghmare

अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना उन्हाच्या झळा

Chief Editor Gajanan waghmare

Leave a Comment