लोकचिंतन

बक्क अप सेवानंद वानखडे सर !

साप्ताहिक लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस

ठाणेदार वानखडे साहेबांनी त्यांचे ‘सेवानंद’ हे नाव आज खऱ्या अर्थाने सार्थ केले. ‘सेवानंद’ म्हणजे ‘सेवेत आनंद’! आज त्यांनी ग्रामीण रुग्णालय हल्ला प्रकरणातील समाजविघातक टोळक्याची चांगली ‘सेवा’ केली आणि महागाववासीयांना ‘आनंद’ही दिला. फक्त वानखडे साहेबांच्या ‘सेवे’चा प्रकार थोडा निराळा होता. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारी मानसिकतेच्या खलप्रवृत्तीची कायदेशीर चौकटीत जशी खरमरीत ‘सेवा’ करायची असते, तशी ‘सेवा’ साहेबांनी केली. मागील एका सप्ताहापासून हल्लेखोर सापडत नव्हते. शेवटी त्यांचा ‘सेवा सप्ताह’ आज मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. महागाव ग्रामीण रुग्णालयात लोखंडी रॉड हाती घेऊन हैदोस घालणाऱ्या हल्लेखोरांच्या टोळक्याने पोलीस प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले होते. १८ ऑगस्टच्या रात्री रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला करून तसेच रुग्णालयात तोडफोड करून या हल्लेखोरांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. घटनेनंतर मागील दहा दिवसांपासून हल्लेखोर फरार होते. पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ‘एडी-चोटीचा जोर’ लावूनही हल्लेखोर सापडत नव्हते. मुख्य सूत्रधार असलेला शेख इजराइल शेख शाबुद्दीन हा सराईत गुन्हेगारासारखा पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा दबाव होता. यातील काही सटरफटर सहआरोपी उंदीर पिंजऱ्यात अडकावे तसे पोलिसांच्या हाती लागलेही; मात्र टोळक्याचा सूत्रधार पोलिसांना सतत गुंगारा देत होता. मात्र ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी आपले कसब पणाला लावून शेख इजराइलच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासोबतच या हिंसक टोळक्यातील प्रवीण उर्फ छकुला विलास कांबळे, योगेश विश्वनाथ खंदारे, श्रीकांत संतोष देशमाने, शुभम जगदीश दोडके आणि दोन विधीसंघर्षग्रस्त हल्लेखोरांच्या मानगुटीला पकडून त्यांना ठाण्यात हजर करण्यात आले. आज यातील प्रमुख हल्लेखोरांची महागाव शहरातून पोलीस गाडीच्या सायरनच्या गजरात ‘जिरवणूक’ काढण्यात आली. मोठ्या माणसांची काढतात ती ‘मिरवणूक’ आणि अशा हल्लेखोरांची काढतात ती ‘जिरवणूक’! यांची चांगली ‘जिरली’ पाहिजे, म्हणून या ‘जिरवणुकी’चे प्रयोजन. कायदा हातात घेणाऱ्यांची अशी चौकाचौकातून ‘जिरवणूक’ काढून ‘सेवा’ केली जाईल आणि तमाम शहरवासीयांना ‘आनंद’ दिला जाईल, असा अवर्णनीय ‘सेवाआनंद’ सेवानंद वानखडे साहेबांनी शहरवासीयांना दिला. यातून गुन्हेगारी प्रवृत्तींनी धडा घ्यावा, ही अपेक्षा. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले तर रस्त्यावर ‘जिरवणूक’ काढून ‘सेवा’ केली जाईल, हा संदेश या निमित्ताने टारगटांना देण्यात आला. सेवानंद वानखडे साहेबांची हातोटी वेगळी आहे, हे ऐकण्यात होते. आज त्याचा प्रत्यय आला.

 

बक्क अप, वानखडे सर!

Related posts

अस्वलाच्या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Chief Editor Gajanan waghmare

लोकचिंतन न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ ठरेल – गणेश भोयर

प्रभाग १ मधील देशी दारू दुकान आणि वाईन बारला शेवटचे कुलुप

Chief Editor Gajanan waghmare

१६ एप्रिलला होणार दारू दुकानाचा फैसला

Chief Editor Gajanan waghmare

गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना उन्हाच्या झळा

Chief Editor Gajanan waghmare

पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या तरुणांचा व पालकांचा सत्कार

Leave a Comment