लोकचिंतन

सवना येथे शेतातील टीन शेड मध्ये वासराचा मृत्यू

 

खडका येथे गारपिट

 

महागाव तालुक्यात आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून सोसाट्याचे वादळ आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. सवना परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सवना येथे शेतकरी गोपाळ देशमुख यांच्या शेतातील शेडवरील टीनपत्रे उडून गेली. या दुर्घटनेत शेडमध्ये बांधलेल्या गायीच्या वासराचा मृत्यू झाला. तसेच सवना आणि वाकोडी परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खडका गावातही मान्सूनपूर्व पावसासह तुरळक गारपीट झाल्यामुळे परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी हवामानामुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Related posts

पंचायत समितीच्या आवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गावठी पिस्टल बाळगणारा पुसदचा आरोपी महागावात सापडला

दोन जुगार अड्ड्यांवर छापे

Chief Editor Gajanan waghmare

ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटमुळे आग

Chief Editor Gajanan waghmare

गोवंश तस्करांचा रक्तरंजीत धुमाकूळ

Chief Editor Gajanan waghmare

लोकचिंतन न्यूज पोर्टल जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे व्यासपीठ ठरेल – गणेश भोयर

Leave a Comment